अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- शिक्षकसेवक भरती गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. म्हणून अनेक ठिकाणी पैसे भरून शिक्षक म्हणून रुजू होण्याचे प्रमाण शिक्षण संस्थांमध्ये सुरु झाले आहे. यामध्ये लाखोंची देवाणघेवाण होत असते.
दरम्यान अशाच जिल्ह्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेत नौकर भरती घोटाळा झाला आहे. श्रीरामपूर मधील कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नोकर भरतीत घोटाळा झाला आहे.
याबाबत तक्रारी झाल्यानंतर संस्थेचे माजी सचिव भाऊसाहेब कराळे आणि अरविंद बुरुंगले यांचे राजीनामे संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आले.
याबाबत राज्यपालांकडेही तक्रार करण्यात आली होती. संस्थेमध्ये सचिव पदावर काम केलेले भाऊसाहेब कराळे आणि अरविंद बुरुंगले यांच्याबाबतही तक्रारी झाल्या होत्या.
याबाबतची चौकशी केल्यानंतर ते दोषी आढळले. दरम्यान पैसे तातडीने परत करण्याच्या सूचना देत चुकीच्या पद्धतीने नोकर भरती करणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी संस्थेच्या बैठकीत दिला.