अहमदनगर ब्रेकिंग :- बसस्थानकासमोरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- शहरातील तारकपूर बसस्थानकासमोर एका अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात दोन महिलांना रंगेहाथ पकडले असून त्यांना ताब्यात घेतले आहे. कोतवाली आणि तोफखाना पोलिसांनी ही संयुक्तपणे कारवाई केली.

पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.तारकपूर परिसरात एका अपार्टमेन्टमध्ये वेश्या व्यवसाय चालतो अशी माहिती मिटके यांना मिळाली. त्यानुसार कोतवाली व तोफखाना पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली.

सुरवातीला दोघांना डमी ग्राहक म्हणून पाठविण्यात आले. त्यांना तेथे वेगळे कृत्य सूरू असल्याचे आढळून आले. वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. या छाप्यात दोन महिलांना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी शहर व परिसरातील अवैध धंद्यावर कारवाईचे धाडसत्र सुरु केले आहे. त्यामुळे अवैध धंदे चालक चांगलेच धास्तावले आहेत. सावेडी परिसरातील व भिस्त बाग उपनगरातील कुंटणखान्यावर छापेारी करत व्यवसाय बंद केला.

दरम्यान सायंकाळनंतर पुणे बसस्थानक व माळीवाडा बसस्थानक परिसरात होत असलेला वावर, पुरुषांना लुटण्याचे प्रकार वाढले असून या परिसरात पोलिसांनी लक्ष घालावे अशी मागणी आता होवू लागली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24