अहमदनगर लाईव्ह 24 टीम : एका ब्युटी पार्लमध्ये शरीर विक्री व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळावर छापा टाकून 16 तरुणींना रंगेहाथ पकडले.
भर वस्तीमध्ये सुरू असलेला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांसह आजूबाजूच्या लोकांनाही धक्का बसला आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी पश्चिम बंगालमधील आसनसोल दुर्गापूर पोलीस आयुक्तालयाच्या गुप्तचर विभागाच्या पोलिसांनी ब्युटी पार्लरमध्ये छापा टाकला.
या छाप्याचा एक भाग म्हणून बंगाल अंबुजातील एका खासगी ब्युटी पार्लरमध्ये पोलिसांनी सेक्स रॅकेटच्या आरोपाखाली 16 महिला आणि एका पुरुषाला रंगेहाथ पकडले.
गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना ब्यूटी पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळत होती. यानंतर आयुक्तालयाच्या गुप्तचर विभागाच्या पोलिसांनी अंबुजा परिसरातील ब्युटी पार्लरमध्ये छापा टाकला.
यासाठी पोलिसांनी सापळा रचला आणि ग्राहक असल्याचे नाटक केले. पोलिसांनी सिव्हील ड्रेसमध्ये ग्राहक म्हणून पार्लरमध्ये पहिले दोन पोलिसांना पाठवले.
साध्या कपड्यातील पोलीस ब्युटी पार्लरमध्ये त्यांच्या कारवायांची माहिती घेण्यासाठी गेले, त्याचवेळी अधिकाऱ्यांना संशय होताच माहिती मिळाली आणि त्यांनी सगळ्यांना तब्यात घेतले.