श्रीरामपुरात अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथील अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ केल्याची घटना काल दुपारी एका खासगी दवाखान्यात घडली.

याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शहरातील मुख्य रस्त्यावरील एका खासगी दवाखान्यात कामाला असलेल्या सचिन उत्तमराव अमोलिक ( रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर ) याने काल दुपारी १२ वाजेच्या सुमारास बेलापूर येथील एका अल्पवयीन मुलाला नोकरी देण्याच्या बहाण्याने श्रीरामपूरला बोलावले व काही टेस्ट कराव्या लागतील, असे सांगून लैंगिक छळ केला.

याप्रकरणी फिर्यादी मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार अमोलिक याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ८/१२ प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर ३११/२०१९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24