‘त्या’ राष्ट्रीय महामार्गासाठी शरद पवारांना ‘ह्या’ आमदारांचे साकडे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात रस्त्यांची दुरवस्था हा नित्याचाच भाग झाला आहे. अनेक आंदोलने या रस्त्यांसाठी होत असतात. परंतु हि परिस्थिती मात्र बदलताना दिसत नाही.

आता आ. संग्राम जगताप यांनी पुढाकार घेत नगर शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गासाठी 28 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्रात प्रलंबित आहे.

हा निधी वितरीत व्हावा यासाठी केंद्राला शिफारस करावी अशी मागणी त्यांनी खा. शरद पवार यांच्याकडे केली आहे. जगताप यांनी आज पवार यांची भेट घेत त्यासंदर्भातील निवेदन दिले.

एनएच. 61 हा राष्ट्रीय महामार्ग कल्याण हायवेवरील रेल्वे ब्रीज ते सक्कर चौकापर्यंतचा रस्ता शहरातून जातो. आमदार जगताप प्रतिनिधीत्व करत असलेल्या शहरातून हा रस्ता जातो.

नॅशनल हायवेचे चिफ इंजिनिअर (कोकण भवन) यांनी 7 फेब्रुवारी 2018 रोजी केंद्रीय वाहतूक व बांधकाम विभागाला हा प्रस्ताव पाठविला आहे. केंद्रात हा प्रस्ताव तेव्हापासून प्रलंबित आहे.

दरम्यान , नगर -मनमाड महामार्गाचीही अशीच दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांचा महामार्ग म्हणून या ममार्गाची आता ओळख झाली आहे. अनेक अपघातही या महामार्गावर झाले आहेत.

या महामार्गावरून वाहने चालवणे म्हणजे वाहनांचा खुळखुळा करण्यासारखे आहे असे मत प्रवासी व्यक्त करतात. असे असले तरीही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे सातत्याने कानाडोळा करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24