अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :- परिस्थितीचे कारणे न देता जिद्द मनात बाळगून प्रयत्न करणाऱ्यांना यश नक्कीच मिळते. याचा प्रयत्य कर्जत तालुक्यातील कापरेवाडी येथील सोनाली कोंडींबा मंडलिक या कुस्तीपटुला आला आहे.
कुस्ती क्षेत्रात मोठे नाव मिळवण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या सोनालीच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. सोनाली म्हणाली, मला श्रींगोंदा येथे प्रशिक्षणासाठी जायचे आहे.
मात्र, कोरोनामुळे प्रशिक्षण केंद्र बंद आहे. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थितीती व्यवस्थित झाली कि मी लवकरच प्रशिक्षण केंद्रात जाईल.
दरम्यान नगर जिल्ह्यातील कापरेवाडी येथील सोनालीने ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत कुस्तीमध्ये दोनवेळा सुवर्णपदक मिळवले आहे. त्याशिवाय इतर स्पर्धांमध्येही तिने यश मिळवले आहे.
आपल्या मुलीने कुस्तीमध्ये भारताचे नेतृत्त्व करावे, अशी सोनालीच्या वडिलांची इच्छा होती. घरची परिस्थिती जरी हलाखीची असली तरी मुलीच्या ध्येयाच्या आड आर्थिक परिस्थितीची भिंत उभी राहणार नाही यासाठी ते शक्य तेवढे तिला पाठबळ देत.
कोरोनाच्या महामारीने सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थितीती ओढवली आहे. मात्र ध्येयवेड्या सोनालीने घरीच छोट्याशा पत्र्याच्या शेडमधे सरावाला सुरुवात केली.
सोनाली सध्या कर्जतमध्ये १२ वीचे शिक्षण घेत आहे. तिच्या संघर्षाची कहाणी राष्ट्रवादीचे कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांना समजली. त्यांनी त्याची दखल घेतली आहे.
आमदार रोहित पवारांचा हातभार: आ. रोहित पवारांनी तिच्या प्रशिक्षणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. याबाबत त्यांनी टविट् केले आहे. त्यांनी म्हटलं आहे. की, सोनालीने खडतर परिस्थितीत मिळवलेल्या या यशाचा मला अभिमान आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved