‘ती’ नर्स कोरोना पॉझिटिव्ह;अनेकांचे धाबे दणाणले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-श्रीरामपूर शहरातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहेत. शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये संपर्कात आल्याने अनेक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

आता येथील नगरपालिकेत सेवेत असणाऱ्या नर्सचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. कारण स्त्राव घेतल्यानंतर तिला क्कारंटाईन न करता ती ड्युटीवर आल्यामुळे तिचा अनेक आशा सेविका, नर्सबरोबर संबंध आला आहे.

तसेच तिने लहान मुलांना डोस दिल्याने लहान मुलांशी तिचा संपर्क आला आहे. त्यामुळे तिला कोरोना झाल्याने या सर्वांचे धाबे दणाणले आहेत.

वॉर्ड नं. 2 मध्ये कोरोनामुळे एका जणाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्याशी संपर्कात आल्यामुळे या नर्सचे 9 जुलै रोजी स्त्राव घेण्यात आले. स्त्राव घेतल्यानंतर तिला होम क्कारंटाईन करणे गरजेचे होते.

तरीही ती ड्युटीवर हजर झाली. या काळात तिचा रुग्णालयातील नर्स व कर्मचार्‍यांशी संबंध आला. एवढेच नव्हे तर तिने अनेक लहान मुलांना महिन्याचे डोसही दिल्यामुळे

तिचे लहान मुलांशीही संबंध आले आहेत. बुधवारी रात्री तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे या सर्वांमध्ये खळबळ उडाली आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24