नगर : दिवंगत लोकनेते पद्मभुषण खा.बाळासाहेब विखे पाटील यांच्या धर्मपत्नी व मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मातोश्री प्रि श्रीमती सिंधुताई बाळासाहेब विखे पाटीलयांचे आज रविवार सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले त्या ८५ वर्षाच्या होत्या. आज प्रवरा ग्रामीण रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
आज दुपारी १२वा. प्रवरानगर येथील पद्मश्री विखे कारखान्याच्या डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहासमोरील प्रांगणात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात जागतिक आरोग्य संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. अशोकविखे, गृहनिर्माण मंञी राधाकृष्ण विखे आणि प्रवरा अभिमत विद्यापिठाचे प्र कुलगुरू डॉ.राजेंद्र विखे ही तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
खासदार डॉ.सुजय विखे यांच्या त्या आजी होत. तर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या सासू होत.
प्रवरेच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. आदर्श स्री, आदर्श माता व आदर्श पत्नी म्हणून त्यांचे कार्य कौतुकास्पद होते.