शिर्डी विमानतळाचा लवकरच होणार विस्तार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

शिर्डी :- विमानतळाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता शिर्डी विमानतळाचा विस्तार करून तेथे नवीन टर्मिनल बांधण्याचे काम सुरू करावे.

ही इमारत पूर्ण होईपर्यंत जुन्या टर्मिनलचा विस्तार तातडीने करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक काल सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उडान योजना तसेच रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या विमानांचा आढावा घेण्यात आला.

तसेच कंपनीच्या वतीने उभारण्यात येणार्‍या अमरावतीतील बेलोरा, पुरंदर, सोलापूर, चंद्रपूर येथील विमानतळांच्या प्रगतीचाही आढावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला.

अमरावती येथील विमानतळाचे काम सुरू झाले आहे. इतरही विमानतळ, तेथील धावपट्टी यांची कामेही वेगाने सुरू करावीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24