शिर्डी – राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथे कदम चहाच्या टपरीजवळ काल सायंकाळी ६ च्या सुमारास प्रदीप बळीराम गायकवाड, वय २६, धंदा नोकरी, रा. सावळीविहीर, ता. राहाता, मागील भांडणाच्या कारणावरुन ६ जणांनी जमाव जमवून कोयत्याने डोक्यात वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
यावेळी प्रशांत गायकवाड याच्याही हातावर कोयत्याने वार करुन मारहाण केली. लाकडी दांड्याने पाठीवर बेदम मारहाण करत शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत प्रशांत गायकवाड व प्रदीप गायकवाड हे दोघे जखमी झाले असून प्रदीप बळीराम गायकवाड या जखमी तरुणाने शिडी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन
मारहाण करणारे आरोपी विकी सोनवणे, अमोल वाघ, गणेश बनसोडे, सुनील अरूण रणधीर, बाळा वाघ, नागेश सुभाष जाधव, सर्व रा. सावळीविहीर, ता. राहाता यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून डिवायएसपी वाघचौरे, पोनि कटके यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोसई जाणे हे करीत आहेत.