शिर्डी :- लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांत तरुणाविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, शिर्डी शहरात कालिकानगर उपनगरात राहत असलेल्या एका २१ वर्षाच्या महिलेबरोबर दीड वर्षापूर्वी संदीप लालचंद भोपळावत (वय २३, रा. दत्तनगर, शिर्डी) याची ओळख झाली.
सदर महिलेला १८ महिन्यांच्या कालावधीत वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. पीडित महिलेने भोपळावत याच्याकडे लग्न करून संसार करू, असे सांगितले.
त्यावर तरुण आज, उद्या लग्न करू, असे सांगत टाळाटाळ करीत असल्याचे सदर पीडितेच्या लक्षात येताच तिने शिर्डी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.