अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची नुकतीच मुंबई येथे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली आहे.
मंगळवारी हे बदलीचे आदेश निघाले आहेत, महाराष्ट्रात अनेक आयएएस व वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कान्हुराज बगाटे यांची बदली शिर्डीहून आता मुंबईला झाली आहे.
बगाटेंची बदली झाल्यानंतर शिर्डी संस्थानची सुत्रे कोणाच्या हातात देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्तीसाठी प्रथम पसंती तुकाराम मुंडे तसेच प्रविण गेडाम यांना आहे. श्री साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी पदी शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष व आयएसआय अधिकारी असायला
हवा व राज्य शासनाने अशा अधिकाऱ्यांची श्री साईबाबा संस्थान वर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करावी अशी मागणी आता साईभक्त व शिर्डीकर, नागरिक करीत आहेत. दरम्यान रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सि.ओ. के.एच. बगाटे यांनी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सुत्रे दि.11 आँगस्ट 2020 रोजी घेतले होते.
मात्र अवघ्या तिनच महिन्यात त्यांची बदली झाली असून महाराष्ट्र राज्य अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. यापूर्वी अरुण डोंगरे यांची देखील अवघ्या पाच महिण्याच्या कालावधीतच बदली झाली होती.
त्यामुळे आता साईबाबा संस्थानचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे सर्व साईभक्त ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved