शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकरांचे प्रयत्न असफल…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे संपर्कप्रमुख कोरेगावकर यांनी पारनेरमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्यासाठी आले होते.

परंतु ते पाच नगरसेवक व आमदार निलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांनी समोर समोर न येण्याचा पवित्रा घेतल्याने कोरेगावकर यांचे प्रयत्न अयशस्वी झाले.

पारनेर येथील शिवसेनेचे पाच नगरसेवक व शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परंतु राज्यात महाविकास आघाडी असल्याने शिवसेनेकडून याबाबत आक्षेप नोंदवल्याने त्यांना पुन्हा शिवसेनेत पाठवण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांना पुन्हा शिवबंधन बांधून शिवसेनेत पाठवण्यात आले, परंतु पारनेर मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात असंतोष असल्याने

राष्ट्रवादी व शिवसेनेचे मनोमिलन करण्यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब कोरगावकर यांना उद्धव ठाकरे यांनी पारनेरमध्ये पाठवले होते. परंतु कोरगावकर यांना रिकाम्या हाती जावे लागले.

आज बुधवारी कोरेगावकर यांनी दोन्ही पक्षाची एकत्रित बैठक लावली होती परंतु माजी आमदार विजय औटी व  निलेश लंके यांच्यातील दुहीने ही बैठकही कोरेगावकर यांना वेगवेगळ्या ठिकाणी घ्यावी लागली

दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते व नेते समोर समोर आले नाहीत त्यामुळे संपर्कप्रमुख यांच्या प्रयत्न अंतीही राष्ट्रवादी व सेनेत संपर्क होऊन शकल्याचे चित्र आज पारनेर मध्ये पाहावयास मिळाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24