अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-अकोले नगरपंचायत निवडणुकीत सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा नारा देत महाविकास आघाडीऐवजी एकला चलोरेची भूमिका शिवसेनेने घेतली.
तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या शासकीय विश्रामगृहावर शिवसैनिकांची बैठक झाली.
आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला गुरुवारी आयोजित बैठकीचे निमंत्रण न दिल्यामुळे शिवसैनिकांनी आक्रमक होऊन काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आगपाखड करत निवडणूक स्वबळावर लढवण्याचे जाहीर केले.
महाविकास आघाडीत मानाचे स्थान मिळाले नाही, तर आम्ही आघाडी धर्म सोडून स्वतंत्र चूल मांडू, असा इशारा शिवसैनिकांनी दिला.
तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व अन्य निवडणुका आघाडीच्या नेतृत्वाखालीच लढल्या गेल्या पाहिजेत. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे शिवसेनेला विश्वासात घेत नाहीत.
शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात येणार असून येत्या काही दिवसांतच शिवसेनेचा मेळावा अकोल्यात घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved