जिल्ह्यामध्ये जानेवारीत 37 अल्पवयीन मुलींला पळविले असल्याचे समोर आले आहे. या 37 मुलीपैकी 18 मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. जानेवारीमध्ये आठ मुलांचे देखील अपहरण झाल्याचे गुन्हे जिल्ह्यातील संबंधीत पोलिस ठाण्यात दाखल झाले आहे. या आठ पैकी तीन मुलांचा शोध लागला आहे.
श्रीरामपूर पोलीस ठाणे हद्दीतून सार्वाधिक चार, पारनेर, पाथर्डी, कोतवाली, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून प्रत्येकी तीन मुलींचे अपहरण झाले आहे.
अल्पवयीन मुलीला किंवा मुलाला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी संबंधीत पोलिस ठाण्यात कलम 363 अंतर्गत फिर्याद दाखल होते.
चार महिन्यांत स्थानिक पोलिसांना या मुलांचा शोध घेता आला नाही तर ही केस अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाकडे येते.
जानेवारीमध्ये जिल्ह्यातील 45 मुले-मुलींचे अपहरण झाले असल्याची नोंद अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाकडे झाली आहे.
प्रियकराने दिलेले लग्नाचे अमिष, त्याने दिलेल्या भूलथापांना बळी पडून अल्पवयीन मुली घर सोडतात.सोशल मिडीया, चित्रपट, मालिका पाहून, जीवन जगण्याचे स्वप्न अल्पवयीन मुली पाहतात. प्रौढ अवस्थेतील मुलांकडे आकर्षित होऊन अल्पवयीन मुली घर सोडतात.