धक्कादायक ! वादातून तरुणावर अ‍ॅसीड हल्ला; या ठिकाणी घडली घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-श्रीरामपूर शहरातील एका मोटार गॅरेजमध्ये असलेल्या दोन कामगारांमध्ये वाद झाला. व या वादातून तरुणाच्या तोंडावर अ‍ॅसीड फेकून जखमी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील काझीबाबा रोडवरील रमजान रज्जाक शेख, (वय 36) हा व त्याचा जोडीदार आत्तार हे एका गॅरेजमध्ये काम करत होते.

आमच्याविषयी मालकास एकाचे दोन का सांगतो असे म्हणून असिफ इसाक आत्तार व इसाक हुसेन आत्तार व अन्य एक (नाव माहिती नाही) अशा तिघांनी एकत्र येवून रमजान शेख याचेबरोबर वाद घालू लागला.

यावेळी हे वाद सोडविण्यासाठी आलेल्यास लोखंडी रॉडने मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच रमजान शेख याच्या तोंडावर अ‍ॅसीड फेकून मारहाण केली व धमकी दिली.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात रमजान शेख यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी असिफ इसाक आत्तार, इसाक हुसेन आतार व एक अन्य अशा तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक श्री. भिंगारदिवे तपास करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24