अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- अहमदनगर शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फळ वाहतुकीच्या वाहनातून दारु तस्करी करण्याचा प्रताप काहींनी केला.
कोतवाली पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. यात दोघांना अटक केली आहे.
बुधवारी दुपारी शहरातील सक्कर चौकात ही कारवाई करण्यात आली.रामचंद्र भिमराव लोकरे (वय २७) व दीपक भारत शेळके (वय २५ रा़ दोघे रा़ कंदर, ताक़रमाळा जि़ सोलापूर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
फळ वाहतूक करणा-या पिकअपमधून दारुची तस्करी होत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी सक्कर चौकात दुपारी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली.
तेव्हा एम़एच़-१७, बी़वाय़-१६१७ या पिकअपमध्ये विदेशी दारुच्या २३ बाटल्या आढळून आल्या.
या कारवाईत पोलिसांनी वाहनासह एकूण ६ लाख १३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com