अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- एकीकडे अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपला फास आवळला आहे. तर दुसरीकडे गुन्हेगाररी प्रवृत्ती वाढीस लागल्या आहेत. चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरु होते कि काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अशातच एक गुन्हा पाथर्डी तालुक्यातील खरवंडी शिवारात घडला. येथील केळगंद्रे वस्तीवर पाच चोरट्यांनी शनिवारी रात्री एक वाजल्यानंतर सशस्त्र दरोडा टाकला.
घराचा दरवाजा बाहेरुन कटावणी उचकटून व महिलेला धारदार शस्त्राचा धाक दाखवून 2 लाख 64 हजार रुपयाचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी घराच्या दरवाजावर दगड मारले असता आरडा ओरडा झाला.
घरातील लोक जागे झाल्याने पांडुरंग केळगंद्रे यांच्या घराला कडी लावून सून वंदना केळगंद्रे यांच्या रुमचा कटरने दरवाजा तोडून घरात घुसले वंदना केळगेंद्रे यांनी चोरट्यांना पहातच प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
परंतु लहान मुलांना जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांनी भीतीपोटी अंगावरील दागीने बळजबरीने घेतले. घरातील कपाटाचे दार तोडून रोख रक्कम चोरुन गेली.
घटनेची माहिती समजताच अहमदनगर पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, पाथर्डी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, सहा.
पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पो. काँ. संदीप गर्ज यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. श्वानपथकाने खरवंडी कासार स्वामी समर्थ मंदीर ते मीडसांगवी असा मार्ग काढला.
पांडुरंग केळगंद्रे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com