अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई करत आहे.या तणावातून अनेकजण आत्महत्या देखिल करत आहेत.
काल रात्री पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील एसटी कर्मचारी सतिष जीवन दगडखैर यांनी विष घेवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत अधिक माहिती अशी, शेवगाव आगारात चालक असणारे सतिष दगडखैर हे एसटी कर्मचाऱ्यांना विलीनीकरण करण्यासाठी आग्रही होते.
त्याच तणावातुन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा सतीश यांच्या नातेवाईकांनी केला आहे. दगडखैर यांच्यावर नगरला उपचारा सुरु असुन त्यांची प्रकृती सुधारात असल्याचे डाँक्टरांनी सांगितले.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी संप सुरू आहे. एकीकडे कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
तर दुसरीकडे सरकार हा संप मागे घेण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आले आहे.
सरकारने आपल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी हे कर्मचारी आग्रही आहेत. दरम्यान नगर येथे खाजगी रुग्णालयात दगडखैर यांच्यावर उपचार सुरु आहेत.