धक्कादायक ! विहिरीत आढळला मृतदेह

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-विहिरीत तरुण, तरुणीचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना जिल्ह्यात घडली आहे.

दरम्यान हा धक्कादायक प्रकार नगर तालुक्यातील दरेवाडी येथे आढळून आला आहे. एकाच ठिकाणी तरुण तरुणीचा मृतदेह आढळून आला असल्याने प्रेम प्रकरणातूृन ही घटना घडली असावी,

असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान रविवारी पहाटे तरुणीचा तर दुपारी सायंकाळी ४ वाजता याच विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अजय सुरेश बडेकर (वय २३) व मानसी भिमा पाचारे (वय २२) असे मयत झालेल्या तरुण, तरुणीचे नाव आहे.

रविवारी पहाटे तरुणीचा मृतदेह विहिरीत पाण्यावर तरंगताना मृतदेह आढळून आला होता. दरम्यान विहिरीच्या काठावर तरुणीसह तरुणीच्या चपला आढळून आल्याने पोलिसांना संशय आला.

यानंतर पोलिसांनी विहिरीत गळ टाकून शोध घेतला असता दुपारी तरुणाचाही मृतदेह आढळून आला. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसात गुन्ह्याची नोंद केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24