अहमदनगर – जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी ०२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे दोन्ही बाधीत काही दिवसापूर्वी मृत्यु पावलेल्या रुग्णाची मुले आहेत,
अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्णाची संख्या आता ३१ झाली आहे.
जामखेड येथील एका व्यक्तीचा काही दिवसापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला होता.मात्र, त्याचा अहवाल आला नसल्याने त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता.
त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियातील सर्वांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात होते. त्यात त्याचे २९ आणि ३५ वर्षीय मुलगे बाधीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्णाची संख्या आता ३१ झाली आहे.
दरम्यान, १२ रुग्णांना यापूर्वीच डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच, मुकुंदनगर येथील ७६ वर्षीय बाधीत रुग्णांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन रूग्णालय देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.
याशिवाय, आज आणखी ०५ जणांना त्यांचे १४ दिवसानंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज देण्यात आला. तसेच एका ७६ वर्षीय व्यक्तीचाही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना संस्थात्मक आणि रूग्णालय देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®