अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :नेवासे तालुक्यातील भानस हिवरे येथील ७४ वर्षांच्या वृद्धाला औषधोपचारांसाठी पुण्याला नेल्यावर कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला.
त्यामुळे नेवासे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आठ झाली आहे. २९ मे रोजी मुंबईहून कारेगावला आलेल्या तरुणाला लागण झाल्याचे समोर आले होते.
त्याच्याबरोबर आलेल्या आठ जणांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान, भानस हिवरे येथून औषधोपचारासाठी पुण्याला मुलाकडे गेलेल्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
निवृत्तीनंतर हे वृद्ध दाम्पत्य भानस हिवरे येथे राहत होते. त्यांचा मुलगा पुण्यात आहे. न्यूमोनियाचा त्रास सुरू झाल्यानंतर हे दाम्पत्य खासगी वाहनाने मुलाकडे गेले.
तेथे ससूनमध्ये तपासणी केल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी दिली. रुग्णाच्या संपर्कातील चार व्यक्तींना नगरला रवाना करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews