धक्कादायक : तब्बल ७०० पेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनाने घेतला जीव !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी १२ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात ७९० पॉझिटिव्ह आढळले. एकूण रुग्णसंख्या ४३,३४९ झाली. मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत १३४,

खासगी प्रयोगशाळेत २५० आणि अँटीजेन चाचणीत ४०६ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील ३२, अकोले १, कर्जत ७, कोपरगाव १, नगर ग्रामीण २२, पारनेर १०,

पाथर्डी १०, राहुरी २, शेवगाव ८, श्रीगोंदे १३, श्रीरामपूर १५, कॅन्टोन्मेंट १, मिलिटरी हॉस्पिटल ११ रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत मनपा ६९, अकोले २, जामखेड ३,

कर्जत ४, कोपरगाव ९, नगर ग्रामीण ३३, नेवासे १६, पारनेर ११, पाथर्डी १२, राहाता १७, राहुरी १६, संगमनेर १०, शेवगाव १३, श्रीगोंदे ४, श्रीरामपूर २४, कॅन्टोन्मेंट ७ रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत मनपा २३, अकोले ५१, जामखेड ३५, कर्जत ३४, कोपरगाव १३, नगर ग्रामीण १, नेवासे ३७, पारनेर ४१, पाथर्डी १७, राहाता ३४, राहुरी ३२,

संगमनेर ३१, शेवगाव २६, श्रीगोंदे १४, श्रीरामपूर १५ आणि कॅन्टोन्मेंट २ रुग्णांचा समावेश आहे. २४ तासात आणखी बारा जणांचा बळी गेल्याने बळींची एकूण संख्या ७०६ झाली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24