अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : पोलीस ठाण्यातील एका आरोपीला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने संबंधित आरोपीला कोरोना चाचणीसाठी अहमदनगर येथे पाठवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी दराडे यांनी दिली आहे.
पाथर्डी पोलीस ठाण्यातील जेलमध्ये पोलीस कोठडीतील एका 26 वर्षीय आरोपीला आज (14) रोजी ताप ,सर्दी ,खोकला याचा त्रास होऊ लागल्याने खबरदारी म्हणून पोलिसांनी तात्काळ आरोग्य विभागाला याची माहिती दिली.
त्यांनतर आरोग्य विभागाच्या एका पथकाने या आरोपीची पाहणी केली. या व्यक्तीमध्ये कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्याने त्याच्या घशातील थुंकीचे नमुने घेण्यासाठी त्याला अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
जेलमधील आरोपीला कोरोनाची लक्षणे दिसल्याने आरोपींच्या सुरक्षसाठी नेमण्यात आलेल्या पोलिसांचे काय असाच प्रश्न पुढे येत आहे.
हा आरोपी तालुक्यातील तोंडोळी येथील सेवनगर तांड्यातील असून बैल चोरी प्रकरणी भादवि 327 या गुन्ह्यात त्याला 13 जून रोजी अटक करण्यात आली आहे.
त्याने पुण्याचा प्रवास केल्याचं माहिती आहे.त्याने ही माहिती लपून ठेवली होती. त्यामुळे त्याची तपासणी करत आहोत अशी माहिती पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews