अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. २० हजारांचा आकडा रुग्णसंख्येने पार करेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. राहाता तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. तालुक्यातील विविध गावांत कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे.
आता राहाता नगरपालिकेत कोरोनाने शिरकाव केला असून 26 अधिकारी व कर्मचार्यांसह कुटूंबातील काही सदस्यांना करोनाची लागण झाली असल्याचे तपासणीत समोर आले आहे.
अद्याप काही कर्मचारी व त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटूंबाची टेस्ट करणे बाकी असून हा आकडा आणखी वाढला जाण्याची शक्यता डॉक्टरांनी व़्यक्त केली आहे.
पालिकेचा सर्व कारभार पाहणारे कार्यालयीन अधिक्षकासह अनेक खातेप्रमुखांना कोरोनाची बाधा झाल्याने दुपार नंतर पालिका बंद करण्यात आली
असून सहा दिवस पालिका कार्यालय बंद राहणार आहे. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, अशी माहिती पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी अजित निकत यांनी दिली.
धक्कादायक बाब म्हणजे पालिकेच्या वसुली विभागात काम करणार्या कर्मचार्यांना कोरोना झाला आहे
आणि ते शहरात कर वसुलीचे काम करत असल्याने रूग्णांची संख्या वाढण्याची भिती वाढली आहे.
दरम्यान, राहाता ग्रामीण रूग्णालयातील एक डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान ही वाढती रुग्णसंख्या पाहता सर्वानी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे ,
सुरक्षा बाळगावी आणि आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved