अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्याची महत्वपूर्ण जबाबदारी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या डॉक्टर आणि कर्मचार्यांनाच कोरोनाचे घेरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय.
सिव्हीलचे काही डॉक्टर आणि कर्मचार्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यातले काहीजण कोविड सेंटरमध्ये काम करत होते. किती डॉक्टर आणि कर्मचारी पॉझिटीव्ह आले आहेत,
याची माहिती संकलित करण्याचे काम सुरु असून कोविड सेंटर व्यतिरिक्त इतर विभागातील डॉक्टर आणि कर्मचार्यांचाही समावेश आहे.
डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचार्यांनाच कोरोनाची लागण झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आता कोणाकोणाला क्वारंटाईन करणार आणि कोण कोणावर उपचार करणार, अशा संभ्रमावस्थेत ‘सिव्हिल’ सापडलंय.
दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून या रुग्णांची काळजी घेण्यासाठी आवश्यक बेड आणि डॉक्टरांची कमतरता भासू नये,
यासाठी जिल्हा प्रशासन कसोटीने प्रयत्न करत असताना डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचार्यांना कोरोनाची लागण होणे ही मोठी चिंताजनक बाब आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com