अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- लोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना आज (शुक्रवार) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे सांगितलं जातय.
आपल्या अनुपस्थितीत आपला मुलगा चिराग पासवान यांच्याकडे पक्षाची सुत्रं सोपवल्याचंही त्यांनी म्हटलंय. पक्षा संबंधी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार तसेच एखाद्या पक्षासोबत जाण्याचा किंवा न जाण्यासंबंधी चिराग पासवान हे निर्णय घेतील.
केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे संस्थापक राम विलास पासवान यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या आयसीयूत उपचार घेत आहेत.
ऐन बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पासवान यांना रुग्णालयात राहावे लागत असल्याने त्यांनी आपले पुत्र आणि एलजेपी अध्यक्ष चिराग पासवान यांना एनडीएतील जागावाटप आणि निवडणूक प्रचारावर लक्ष ठेवायला सांगितले आहे.
रामविलास पासवान यांनी म्हटले की, कोरोना संकट काळात खाद्य मंत्री म्हणून आपली सेवा देण्यासाठी योग्य वेळी खाद्य सामग्री जागेवर पोहचवण्यासाटी हरएक प्रयत्न केले.
याच दरम्यान प्रकृती आणखीन खालावू लागली. परंतु कामात काही अडथळे येऊ नये यासाठी मी रुग्णालयात दाखल होण्याचे टाळत होतो.
मात्र, माजी प्रकृती ढासळल्याचं चिरागच्या लक्षात येताच त्याच्या सांगण्यावरुन मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved