ब्रेकिंग

धक्कादायक : पाथर्डी तालुक्यातील कोरोना बाधित विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- नुकतेच पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.(corona news)

त्यामुळे मिरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील संपूर्ण टीम डमाळवाडीत दाखल झाली. त्यांनी कोरोना पॉझिटिव निघालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसह इतर काही विद्यार्थ्यांची तपासणी केली असता आणखी दोन विद्यार्थी रॅपिड चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आल्याने पॉझिटिव विद्यार्थ्यांची संख्या आता सात झाली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी लहान मुलांना कोरोणाची लागण होत असल्याचे प्रमाण वाढत असून त्याचाच एक भाग म्हणून याचे लोन पाथर्डी तालुक्यातही आले असून डमाळवाडीतील सात विद्यार्थी कोरोना बाधीत झाल्याचे पुढे आले आहे.

मुुख्याध्यापकासह पाच विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्याने शिक्षण विभागाने २३ डिसेंबर पर्यंत ही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

शाळेच्या मुख्याध्यापकांना त्रास होऊ लागल्यानंतर त्यांनी कोरोणाची टेस्ट केली त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. रिपोर्ट पॉझिटिव आल्यानंतर मुख्याध्यापकांनी सहशिक्षक त्याचबरोबर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली असता पाच विद्यार्थी पॉझिटिव आढळून आले.

ही माहिती मिळताच मिरी आरोग्य केंद्रातील टीमने विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सर्वांची टेस्ट घेतली त्याच बरोबर इतरही काही विद्यार्थ्यांचे रिपोर्ट घेतले असता आणखी दोन विद्यार्थी रॅपीड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळून आल्याने विद्यार्थ्यांची संख्या आता सात झाली आहे.

Ahmednagarlive24 Office