अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : प्रशासनाने कोरोनाच्या प्रसारास आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभे केले आहेत. परंतु बऱ्याचदा या ठिकाणावरून अनेकदा विविध तक्रारी येत असतात.
आता श्रीगोंदे शहरातील समाजकल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहमध्ये सुरु केलेल्या कोविड-19 या विभागात दिले जाणारे जेवण अत्यंत निकृष्ठ असल्याची तक्रार युवक काँग्रेसचे स्मितल वाबळे यांनी केली
असून या बाबत लवकरात लवकर दखल घेऊन रुग्णांना न्याय द्यावा अन्यथा अहमदनगर युवक काँग्रेस या वतीने वसतिगृहाच्या दारात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ह्या समाजकल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहमध्ये चालू केलेल्या कोविड-19 या विभागात कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणीसाठी लागणारे घटक घेतले जातात आणि रिपोर्ट येईपर्यंत त्या व्यक्तींना तिथेच वसतिगृहामध्ये ठेवले जाते.
परंतु त्या ठिकाणी असलेल्या रुग्णांना मिळणारे जेवण अतिशय निकृष्ट असल्याचे तेथील रुग्णांनी सांगितले. अतिशय निकृष्ट असलेल्या जेवणात चपात्या अर्धवट भाजलेल्या,
पातळ भाजी, सकाळचे जे दिले तेच जेवण संध्याकाळी दिले जात असल्याची माहिती मिळाली. तसेच त्या व्यक्तींना झोपण्यासाठीही निव्वळ कॉट सोडली तर काहीही साधन सामग्री मिळत नाही अशी तक्रार तेथील रुग्णांनी केली आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर याबाबत बोलताना म्हणाले, जेवणाबाबतीत ज्यांनी कुणी तक्रार केली आहे ती चुकीची आहे. जेवण चांगले आहे, मी पण एकदा जेवण केले आहे.
रोज नगरपालिकेचे कर्मचारी येऊन स्वच्छता करतात. परंतु एक जणाला पुणे येथे जायचे होते. आम्ही त्यास प्रतिबंध केला म्हणून कदाचित त्याने चुकीची तक्रार केली असावी.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews