अहमदनगर मध्ये ‘त्या’ तबलिगींना अटक, धक्कादायक माहिती समोर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर ;- तबलिगी जमातीच्या मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक हे कायद्याचे उल्लंघन करून नगरमध्ये राहिल्याने त्यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आहे.

तबलिगी जमातच्या मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक व्हिसाचा गैरवापर करत असल्याचं उघडकीस आले आहे. पर्यटन व्हिसावर आलेले असताना ते व्हिसामधील अटीचे उल्लंघन करून धर्मप्रसार करत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस चौकशीत समोर आलीय.

नगरला आलेले 29 परदेशी नागरिक आणि त्यांना मदत करणाऱ्या अन्य पाच नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. नगरमधील भिंगार, जामखेड, नेवासा पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

जिल्हा न्यायालयात शनिवारी (दि.१८) तबलीकी जमतीच्या दिल्ली येथील मरकज कार्यक्रमासाठी उपस्थिती लावलेल्या त्या नगर जिल्ह्यातील मस्जिद सापडलेल्या सर्व मुस्लिम समाजातील दुभाषिक २४ प्रदेशी व ५ भारतीय असे एकूण २९ जणांना हजर केले.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात मिळून आलेल्या तबलीकी जमताच्या दिल्ली येथील मरकज कार्यक्रमास उपस्थित राहिले. जामखेड, नेवासा, भिंगार येथील मस्जिदमध्ये सापडलेल्या त्या मुस्लिम समाजातील दुभाषिक २४ प्रदेशी व ५ भारतीयाचा तपासणी अहवाल आला.

त्या सर्वाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडले. परंतु या सर्वांना पर्याटन व्हिसा होता. पण त्या सर्वांनी धर्म प्रसारासाठी काम करून त्यांनी उल्लंघन केल्याचा त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानुषंगाने त्या सर्वांना शनिवारी (दि.१८) दुपारी १२ वाजता जिल्हा न्यायालयात हजार करण्यात आले.दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये मरकजसाठी अनेक देशातील नागरिक आले होते.

त्यातील काही जण नगरमधील मुकुंदनगर, जामखेड, नेवासा येथील धार्मिक स्थळी राहिले होते. या तिन्ही ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली.

त्यात काही नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे तपासणीत समोर आले आहे. जिबुती, बेनिन, डिकोटा, आयव्हेरी कोस्ट, घाना, इंडोनेशिया, ब्रुनई या देशातील हे नागरिक आहेत. त्यांना वास्तव्य करण्यास मदत करणाऱ्यांविरूद्ध यापूर्वीच गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील चार जणांना करोनाची लागण झाली होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24