पंधरा दिवसांपूर्वीच रचला होता ‘त्या’ खुनाचा कट ! पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील मुकुंद जयसिंग वाकडे यांचा खून करण्याचा कट पंधरा दिवसांपूर्वी दत्तात्रय पठाडे व त्याच्या प्रेयसीने रचला होता,

अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. आरोपी दत्तात्रय पठाडे व महिलेचे तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते, याची मुकुंदला माहिती होती.

मयत मुकुंद वाकडे यानेही महिलेला त्रास दिला. त्या महिलेने आपल्या प्रियकरास मुकुंद मला त्रास देत आहे. तू त्याला संपवून टाक. अन्यथा मला जगणे अवघड होईल, असे सांगितले.

त्यानंतर दत्तात्रय पठाडे हा मुकुंदवर पाळत ठेवून होता. शनिवारी संध्याकाळी दत्तात्रय पठाडे यास या महिलेने मुकुंदची माहिती दिली. त्यानंतर दत्तात्रयने डाळिंबाच्या बागेत मुकुंदचा खून केला.

…असे केले नाटक
खून केल्यानंतर दत्तात्रय पठाडे गावात आला. त्याने आपला मित्र सचिन भाऊसाहेब शिंदे याला डाळिंबाच्या बागेत मृत्यू झाला आहे. आपण मळ्यातून जाऊन येऊ, असे सांगितले.

त्यानंतर दोघे जण मळ्यात गेले. येथे मुकुंदचे प्रेत आढळले. अंत्यविधीची तयारी आणि ढोंगीपणा दत्तात्रय पठाडे याने मुकुंदचे प्रेत पाहून डोळ्याला पाणी आणण्याचे नाटक केले होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24