अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात मृत्यूंचे तांडव घातलेल्या कोरोना व्हायरस बबत धक्कादायक माहिती समोर आलीय लखनऊमध्ये एका रुग्णात तब्बल २० दिवसांनी कोरोनाची लक्षणे दिसली आहे. त्यामुळे कोरोना सध्या वर्तणूक बदलत असल्याचे मत काहिंनी व्यक्त केले आहे.
कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत असून भारतातही भीती वाढत आहे. सध्या भारतात कोरोनाची १ हजार २५१ प्रकरणे आहेत. कोरोनाची लक्षणे उशीरा दिसल्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार केले जात नाही आहेत. साधारणत:१४-१५ दिवसांत कोरोनाची लक्षणे दिसून येतात.
त्यानंतर त्या रुग्णांची चाचणी केली जाते. क्वारंटाईनमध्ये राहिल्यानंतर आठवड्याभरात रुग्ण पॉझिटिव्ह आहे की नाही हे कळते. मात्र पहिल्यांदाच हे कळण्यासाठी २० दिवसांचा कालावधी लागला. कोरोनाची लागण झालेली ही महिला वृद्ध असून, याआधी तिच्या ३५ वर्षीय डॉक्टर सुनेला कोरोनाची लागण झाली होती.
दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेची प्रकृती स्थिर असली तरी, चाचणीचे रिपोर्ट तब्बल २० दिवसांनी आले ही चिंतेची बाब आहे. एक ते दोन आठवड्यात कोरोनाची लक्षणे दिसणे अपेक्षित आहे. भारतात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com