धक्कादायक : जमिनीत अर्धवट पुरलेल्या अवस्थेत नवजात अर्भक सापडले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- शेवगाव तालुक्यातील ढोरसडे शेत शिवारात नवजात अर्भक सापडले आहे. अवघ्या काही तासांचे असणारे हे जिवंत अर्भक ऊसाच्या सरीत टाकलेले आढळून आले.

अतिशय घृणास्पद हा प्रकार घडल्याने परीसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सकाळी ११ वाजता कांदा काढणीसाठी आलेल्या रोजगार महिलांना लहान बालकाचा रडण्याचा आवाज ऐकू आला.

त्यांनी त्याठिकाणी पहिले असता एक लहान अर्भक सरीत पडलेले आढळून आले. महिलांनी त्याची कल्पना शेतमालक , सरकारी डाॅक्टर व पोलिसाना दिली.

ढोरसडे येथील गणेश खंबरे यांच्या ऊसाच्या शेतात हे अर्भक सापडले. जायकवाडी धरण परीसरातील कमी लोकवस्ती असलेल्या भागात हि अशोभनीय घटना घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ कैलास कानडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सहकारी डॉक्टर व नर्स यांच्या मदतीने या नवजात अर्भकाचा नाळ बांधून या स्त्री जातीच्या अर्भकास स्वच्छ केले. ते जमिनीत अर्धवट पुरलेल्या अवस्थेत होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24