अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मुलाला जन्म देवून दुसऱ्याच दिवशी आईचा मृत्यू झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणीत घडली.प्रिंपी – वळण येथील माहेर असलेल्या भाग्यश्रीला पहिली मुलगी होती . आता दूसऱ्या वेळेस मुलगा झाल्याच्या आनंदाला मात्र ती मुकली अन् पती , मुलीलाही सोडून ती अनंताच्या प्रवासाला निघुन गेली.
मन हेलावणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गरोदरपणाचा नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्याने भाग्यश्री रामेश्वर हापसे ( वय २४ ) यांना शहरातील एका खाजगी दवाखान्यात शुक्रवारी सकाळीच दाखल केले. काही वेळात प्रसुती झाली अन् मुलागा झाला.
पहिली चार वर्षाची मुलगी स्वरा अन् आता मुलगा झाला. त्यामुळे सासर – माहेरकडील नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मात्र , शुक्रवारी रात्री जास्त त्रास होत असल्याने नगरमध्ये हलविण्यात आले.
बाळाच्या आईला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले मात्र , यश आले नाही. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जिल्हा शासकीय रुग्णालयात मयताचे शवविच्छेदन करण्यात आले.
शनिवारी रात्री ९ च्या दरम्यान भाग्यश्री हापसे यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले . एकीकडे सरकार माता – मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र , माता मृत्यूच्या घटना घडत आहे. गरोदर मातांसाठी ही चिंतेची बाब आहे . बाळ व्यवस्थित आहे पण , आई गमावल्याचे दुःख कुटुंबासाठी कायम आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com