अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- जगावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे, संशोधक लस शोधण्याचे काम करत आहे. मात्र अद्यापही यश आले नसल्याने हे संकट दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्येने आज तब्बल ३०००० चा आकडा पार केला आहे , आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास ३००९५ रुग्णांना कोरोना व्हायरस ची लागण झाल्याची माहिती आज समोर आली आहे.
दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५०१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४११६ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १०९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १८४ आणि अँटीजेन चाचणीत २०८ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४०, संगमनेर १०, नगर ग्रामीण ०३, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट ०५, नेवासा ०१, श्रीगोंदा ०१, पारनेर ०१, अकोले २१, राहुरी १९, शेवगाव ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १८४ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये,
मनपा ३९, संगमनेर १२, राहाता १८, पाथर्डी ०३, नगर ग्रामीण १०, श्रीरामपुर ३१, कॅंटोन्मेंट ०२, नेवासा ०९, श्रीगोंदा ०१, पारनेर ०६,अकोले ०८, राहुरी २४, कोपरगांव ०४, जामखेड ०८ आणि कर्जत ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २०८ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा ३३, संगमनेर १०, राहाता ४२, पाथर्डी १७, श्रीरामपूर ०५, श्रीगोंदा २०, पारनेर ०९, अकोले २८, राहुरी ०२, शेवगाव ०१, कोपरगाव ०७, जामखेड १३ आणि कर्जत २१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ७०६ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २०२, संगमनेर ७१, राहाता ६०, पाथर्डी ४३, नगर ग्रा.३५,
श्रीरामपूर २४, कॅंटोन्मेंट १४, नेवासा ४४, श्रीगोंदा २७, पारनेर २६, अकोले ४२, राहुरी ३०, शेवगाव ११, कोपरगाव ३९, जामखेड १९ कर्जत १७ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved