अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : कोपरगाव तालुक्यातील धामोरी गावातील ग्रामपंचायत शिपायाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मोहन आबाजी वाणी असे शिपायाचे नाव असून ते धामोरी ग्रामपंचायतचे कर्मचारी होते.
सकाळच्या सुमारास त्यांनी धामोरी ग्रामपंचायतच्या जुन्या कार्यालयातील इमारतीत आत्महत्या केली.
घटनास्थळी कोपरगाव पोलिसांनी सदर घटनेची पाहणी करून कोपरगाव आरोग्य केंद्रात मृतदेह पीएम साठी पाठवला आहे.
या शिपायाच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews