अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. आता कोरोना कारागृहात देखील दाखल झाला आहे. जिल्ह्यातील अनेक कारागृहातील कैद्यांना कोरोना झाला आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांसाठी राहुरी कृषी विद्यापीठ येथे तात्पुरते कोविड केअर सेंटर उभे केले आहे. परंतु या सेंटरमधूनच एक कैदी फरार झाल्याची घटना घडली आहे.
शनिवारी सकाळी हा प्रकार घडला असून पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. या ठिकाणी श्रीरामपूर, पारनेर व नेवासा पोलिस ठाण्याच्या उपकारागृहातील करोना पॉझिटिव्ह आढळलेले 55 कैदी ठेवले होते.
त्यातील एका कैद्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. शेतकरी निवास इमारतीच्या आसपास जिल्ह्यातील पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आहे.
शिवाय इमारतीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत.
ही सुरक्षा व्यवस्था भेदून कैदी पसार झाल्याने खळबळ उडाली. या कैद्यावर जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved