धक्कादायक : गुटखा न दिल्याने ‘त्याने’दुकानदारासोबत केले असे काही !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- राहुरी शहरातील जोगेश्वरी आखाडा येथे गुटखा दिला नाही म्हणून चार ते पाच अज्ञात तरुणांच्या टोळक्याने दुकानदारावर चाकूने हल्ला केला.

ही घटना काल सोमवार दि.4 मे रोजी सकाळी 12 वाजेच्या दरम्यान घडली. मात्र, सुदैवाने या दुकानदाराने प्रसंगावधान राखत आपला जीव वाचविला.

हा वाद मिटविण्यासाठी तेथीलच दत्तात्रय धनवटे हा तरुण गेला असता त्याच्या हातावर सत्तूर लागल्याने तो जखमी झाला आहे.

या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून यावेळी नागरिकांची पळापळ झाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, चालक पोलीस हवालदार पथवे, उत्तरेश्वर मोरळे यांनी

घटनास्थळी जाऊन हल्ला करणार्‍या दोन तरुणांसह दोन मोटारसायकल, एक धारदार हत्यार पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले.

मात्र दोघे पसार झाले आहेत. काल राहुरी पोलीस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24