धक्कादायक : दारु पिऊ न दिल्याने चाकुने भोकसले!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 : संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे दारुच्या वादातून एका तरुणास चक्क चाकुने भोकसल्याची धक्कादायक घटना गुरूवारी (दि.14) रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

समाजमंदीराच्या जवळ दारु पिण्यास मनाई केल्यामुळे हा प्रकार घडल्याची प्रथमदर्शनीय माहिती पोलिसांना मिळाली आहे. यात काशिनाथ पुंजाजी जगताप (वय 36) यांच्या छातीवर तसेच पोटावर वार करण्यात आले आहे.

याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अनिल रंगनाथ जगताप (रा. तळेगाव दिघे) यास अटक केली आहे.

काशिनाथ पुंजाजी जगताप (रा. जुनेगाव, तळेगाव, ता. संगमनेर) हे रिक्षाचालक आहे. ते बुधवार दि.13 रोजी तळेगाव येथील समाजमंदीराच्या जवळ बसले होते. त्यावेळी आरोपी अनिल जगताप हा तेथे मद्य पिण्यासाठी आला होता.

मात्र, तेथे दारु पिण्यास काशिनाथ यांनी विरोध केला. त्यामुळे दोघांमध्ये चांगलीच जुपली होती. दरम्यान आरोपीने त्यावेळी शिवीगाळ दमदाटी करुन धमकी दिली आणि तो निघून गेला.

मात्र, आपल्याला समाजमंदीराच्या जवळ दारु पिण्यास विरोध केल्यामुळे त्याच्या डोक्यात रोष कायम राहिला. दुसर्‍या दिवशी म्हणजे गुरूवार दि.14 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास काशिनाथ यास तळेगाव चौकात बोलावून घेतले.

त्याला जाब विचारुन अचानक जवळ असलेल्या चाकुने त्याच्यावर वार करण्यास सुरूवात केली. यावेळी काशिनाथ यांच्या छाती व पोटावर गंभीर जखमा झाल्या आहेत.

हा प्रकार स्थानिक काही ग्रामस्थांनी पाहिला असता त्यांनी सोडवासोडव केली. काशिनाथ हे जखमी होऊन जमिनीवर कोसळले. त्यामुळे काही काळानंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24