धक्कादायक : ‘त्या’ मृत महिलेच्या सुनेला कोराेनाची लागण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :   पारनेर तालुक्यातील सुपे येथील कोरोना बाधित ५६ वर्षीय मृत महिलेच्या २८ वर्षीय सुनेस कोरोनाची बाधा झाल्याने सुपे येथील नागरीकांची चिंता वाढली.

महिलेच्या संपर्कात आलेल्या ३३ व्यक्तींच्या घशातील स्त्राव घेण्यात आल्यानंतर शनिवारी प्राप्त झालेल्या १० अहवालांपैकी ९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले, तर महिलेच्या सुनेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर आतापर्यंत बाहेरगावांवरून आलेल्या व्यक्तींनाच कोरोनाची बाधा झाली होती. सुपे येथील ५६ वर्षीय महिलेस श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तिला तेथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तेथे कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले. परंतु संबंधित डॉक्टरने शासकीय यंत्रणेस माहिती न दिल्यामुळे या महिलेवर योग्य उपचार होऊ शकले नाहीत,

त्यात महिलेचा मृत्यू झाला.मृत्यू पश्चात घेण्यात आलेल्या स्त्रावाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर मात्र यंत्रणा खडबडून जागी झाली.

महिलेच्या संपर्कात आलेल्या तब्बल ३३ व्यक्तींच्या घशातील स्त्राव घेण्यात येऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले असता शनिवारी सकाळी त्यापैकी १० अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ९ अहवाल निगेटिव्ह, तर एक अहवाल पॉझिटीव्ह आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24