धक्कादायक! 2 तास रस्त्यावरच पडून होता क्वारंटाइन व्यक्तिचा मृतदेह ;हे कारण आले समोर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पुसदजवळच्या हुडी या ठिकाणी होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तिचा रस्त्यावरच संशयास्पद मृत्यू झाला.

धक्कादायक म्हणजे PPE किट आणि डॉक्टरच उपलब्ध नसल्याने हा मृतदेह २ तास रस्त्यावरच पडून होता.

यामुळे प्रशासनाचे आरोग्य सुविधांविषयी पितळ उघडे पडले आहे.

सदर व्यक्ति काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधून आला होता.

आरोग्य तपासणीसाठी तो हुडीवरून पुसदला ७ किमी चालत बायकोसह आला होता.

शहरात आल्यानंतर दवाखाण्यातून परत जाताना त्याला अस्वस्थ वाटून लागलं आणि रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

आरोग्य विभागाला माहीती कळाल्यानंतर रुग्णवाहिका तातडीने तिथे आली मात्र त्यात डॉक्टरच नव्हता.

त्यानंतर PPE किटचाही नगरपरिषदेकडे अभाव असल्याने त्या मृतदेहाला हात लावण्यास कुणीच तयार नव्हते. त्यामुळे तब्बल दोन तास मृतदेह तसाच रस्त्यात पडून होता.

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24