धक्कादायक ; या कारणामुळे होतोय एचआयव्हीचा प्रसार…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  एचआयव्ही जनजागृती होत असूनही एचआयव्हीच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. हरियाना राज्यातील हिसारमध्ये समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या जोडप्यांमध्ये एचआयव्हीचे काही रुग्ण आढळले आहेत.

कायद्याने समलैंगिक संबंधाना मान्यता दिली असली तरी अद्याप समाजाणे अशा प्रकारचे संबंध स्वीकारलेले नाही.

एका विशेष कार्यक्रमाअंतर्गत हिसार येथे एक सर्वेक्षण करण्यात आले असून त्यात समलैंगिक संबंधांच्या 39 जोडप्यांचा अभ्यास करण्यात आला.

या सर्वांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, आणि यातील पाच जणांना एचएआयव्हीची लागण झाले असल्याचे आढळले.

जे लोक हे सर्वेक्षण करतात त्यांना असा विश्वास आहे की जर असे संबंध असलेले लोक पुढे आले तर एचएआयव्हीची असलेल्यांची संख्या आणखी मोठी असू शकते. 

टारगेटेड इंटीग्रेटिड प्रोग्रामच्या मुख्य व्यवस्थापक बिंदिया गौतम सांगतात की गेल्या दीड वर्षापासून आम्ही या प्रोग्राम अंतर्गत काम करत आहोत.

त्या लोकांना शोधणे फार कठीण झाले आहे. आम्ही आता समलैंगिक संबंधांबद्दल त्यांना जागरूक करण्याच्या व्यवस्थे अंतर्गत काम करत आहोत.

ज्यामध्ये एखादी व्यक्ती आमच्या शिबिरात  येऊन त्याविषयी बोलली तर आम्ही त्याला उपचार उपलब्ध करून देतो तसेच त्याच्या सहकार्यांना शोधण्याचे कामही करतो.

अशा कार्यक्रमात, लोकांना पुढे येऊन उपचार मिळावेत याची जाणीव व्हावी म्हणून अनेक शिबिरे आयोजित केली जातात. 

हरियाणा एड्स कंट्रोल सोसायटी द्वारा व इंडियन रेडक्रॉस सोसायटीमार्फत हा कार्यक्रम त्या पुरुष किंवा स्त्रियांसाठी आहे ज्यांचे असुरक्षित लैंगिक संबध ठेवले आहेत

या कार्यक्रमात एचआयव्ही संबंधित तपासण्या तसेच विनामूल्य सल्ला देण्यात येतो तसेच गुप्त रोगांचे मोफत उपचार देखील दिले जातात.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24