धक्कादायक : बिअर घेवून गेलेला ‘तो’ तरुण निघाला कोरोना पॉझीटीव्ह !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 : गंगापूर येथील करोनाबाधित रुग्ण व त्याचा साथीदार नेवासाफाटा येथून 11 मे रोजी बिअरचे पार्सल घेऊन गेल्याचे स्पष्ट झाल्याने नेवासाफाटा येथील मद्य विक्रेत्याला तपासणीसाठी नगरला नेण्यात आले आहे.

नेवासाफाटा येथून 11 मे रोजी एका व्यक्तीने एका दुकानातून बियरचे पार्सल नेले होते. सदर व्यक्तीस काल त्रास जाणवू लागल्याने त्याला औरंगाबाद येथे पुढील तपासणीस हलविण्यात आले.

त्याच्या तपासणीत तो करोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले. तो कोणकोणत्या ठिकाणी व्यक्तीच्या संपर्कात आला असे विचारले असता त्याने नेवासाफाटा येथील एका बिअर शॉपीमधून बिअर नेल्याचे सांगितले.

त्यामुळे सदर बिअर शॉपी मालक व त्याचे इतर तीन कर्मचारी यांना ताबडतोब अहमदनगर येथे क्वारंटाईनसाठी पाठवून पुढील तपासण्यासाठी पाठविल्याची माहिती मिळाली आहे.

नगर-औरंगाबाद महामार्गावर प्रवरासंगम येथे दोन्ही जिल्ह्यांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही सदरची करोनाबाधीत व्यक्ती गंगापूरला बिअर घेऊन कशी गेली? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. सदर घटनेची माहिती समजताच घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24