धक्कदायक : अहमदनगर जिल्ह्यात अचानक वाढली कोरोना रुग्णांची संख्या, वाचा चोवीस तासातील अपडेट्स

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ७१६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१८ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १४५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९०७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६९ आणि अँटीजेन चाचणीत २८ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले ०३, जामखेड ०२, कर्जत ०१, नगर ग्रामीण १३, पारनेर ०१, पाथर्डी ०२, संगमनेर १०, श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२, अकोले ०३, जामखेड ०१, कर्जत ०१, कोपरगाव ११, नगर ग्रामीण १०, पारनेर ०४, राहाता ०६, राहुरी ०४, संगमनेर ०९,

शेवगांव ०२, श्रीरामपूर ०४, जिल्ह्याबाहेरील ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज २८ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०८, जामखेड ०१, कर्जत ०२,

कोपरगाव ०१, नेवासा ०१, राहता ०६, राहुरी ०१, संगमनेर ०३, श्रीरामपूर ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १९, अकोले ०६,

जामखेड ०४, कर्जत ०८, कोपरगाव १४, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०२, पारनेर ०१, पाथर्डी ११, राहाता १३, राहुरी ०१, संगमनेर २३, शेवगाव ०६, श्रीगोंदा १२, जिल्ह्याबाहेरील ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24