धक्कादायक : पळालेला तो रुग्ण निघाला कोरोना पॉझिटिव्ह !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :- कल्याणहून आलेल्या पॉझिटिव्ह आजीच्या संपर्कातील तिच्या मनोरुग्ण नातवाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली.

तालुक्यातील तो सहावा रुग्ण ठरला. तो जिल्हा रुग्णालयातून पळून गेला होता. घोडेगावात त्याला ताब्यात घेतले. नेवासे बुद्रूक येथील मुलीला भेटण्यासाठी कल्याण येथून २० मे रोजी ही महिला आल्यानंतर तिला स्थानिक शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते.

२२ ला त्रास होऊ लागल्यानंतर तिला नगरला पाठवले. २४ मे रोजी तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तिच्या संपर्कातील सात व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी नेण्यात आले होते.

चार व्यक्तींचे स्त्राव घेण्यात आले. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. महिलेचा जावई व नातवास नगर येथे पाठवले होते. मात्र, तपासणी न करता त्यांनी जिल्हा रुग्णालयातून पळ काढला.

२५ मे रोजी या महिलेचा जावई नेवासे येथे आल्याचे समजताच ग्राम दक्षता समितीने त्यास विलगीकरण कक्षात दाखल केले. बुधवारी दोघांचे स्त्राव घेऊन नगरला पाठवण्यात आले. नातवाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह व जावयाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24