अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-पाथर्डी शहरानजीक असलेल्या तनपुरवाडी गावाच्या जवळ राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर वीज वाहक तारा तुटून पडल्याने वाटसरुची मोटारसायकल तारांवरून गेल्याने विजेचा धक्का लागून दोघे जन गंभीर जखमी झाले आहेत.
किरण रघुनाथ पंडित व निवृत्ती महादेव पंडित अकोला येथील रहिवासी हे दोघेजण पाथर्डी येथे दुचाकीवरून येत असताना तनपुरवाडी पुलावर उच्च दाबाच्या वीज वाहक तारा तुटून पडलेल्या होत्या.
या तारांचा त्यांना अंदाज न आल्याने त्यांची गाडी थेट वीज वाहक तारांना जाऊन चिकटली. यामध्ये दोघांनाही विजेचा धक्का बसल्याने गंभीर जखमी झाले आहेत.
त्यांना उपचारासाठी शहरातील नवजीवन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे वीज वाहक तारा महामार्गावर पडल्याने जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तारांना संरक्षक जाळी नसल्याने हा अपघात घडला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved