धक्कादायक : अहमदनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये सापडली ‘ही’ वस्तू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- शहरातील काही भागात गेल्या ८ दिवसांपासून पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने नगरसेवक गणेश भोसले व नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी आज थेट वसंत टेकडी वरील महापालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पालाच भेट देऊन पाहणी केल.

अहमदनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये रिकामी गोणी अडकून बसल्याचे निदर्शनास आले. यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातील सारसनगर, भोसले आखाडा, स्टेशन परिसरात गेली आठ दिवसांपासून पुरेसा व वेळेत पाणी पुरवठा होत नाही.

त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. त्यांनी परिसरातील नगरसेवकांशी संपर्क केला. नगरसेवक भोसले व भागानगरे यांनी ही बाब महापालिका अधिकाऱ्यांना सांगितली.

तरीही पाणी पुरवठा सुरळीत होत नव्हता. म्हणून आज दुपारी वाजताच्या सुमारास भोसले व भागानगरे यांनी वसंत टेकडी येथील महापालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पाला भेट दिली

तेथील उपाय योजना व यंत्र सामुग्रीची पाहणी केली. यावेळी महापालिकेचे पाणी पुरवठा विभाग प्रमुख महादेव काकडे उपस्थित होते.

त्यावेळी भोसले व भागानगरे यांना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये रिकामी गोणी अडकून बसल्याचे आढळून आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24