अहमदनगर लाईव्ह24 टीम :- बारामतीच्या ‘त्या’ कोरोना बाधित व्यक्तीच्या श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातील तीन जण संपर्कात आले होते.
त्यांची नगर येथील सरकारी रुग्णालयात सोमवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.
काल रविवारी बारामती येथील एक आणि नगरच्या दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सगळीकडे खळबळ उडाली.
बारामती आणि नगरच्या मध्यभागी असणाऱ्या श्रीगोंदयातील लोक अजूनही बिनधास्त आहेत.
आपल्यापर्यंत कोरोना येणारच नाही या भ्रमात असणाऱ्या श्रीगोंदेकरांसाठी ही बातमी महत्वाची आहे.
बारामती येथील त्या व्यक्तीच्या संपर्कात श्रीगोंदयातील तीन जण आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे.
आता हे तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत की नाहीत यासाठी त्यांच्या तपासणी करण्यासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले जात आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी याला दुजोरा दिला आहे.
त्या व्यक्तीच्या हे तिघे संपर्कात आल्याची माहिती मिळाल्याने खात्री साठी त्यांच्या तपासण्या करून वरिष्ठ पुढील निर्णय घेतील.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com