अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- नेवासा तालुक्यातील सोनई येथील रहिवासी असलेल्या १८ वर्षीय तरूणीचे अपहरण करून आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो काढून तिलला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोनई पोलीस ठाण्यातून समजलेली माहिती अशी, की सोनई येथील हलवाई गल्लीत राहणाऱ्या १८ वर्षे वयाच्या तरूणीने फिर्थाद दिली आहे.
त्यात तिने म्हटले आहे की सन २०१७, २०१८ ते ५ सप्टेंबर २०२० पर्यंत तिला बळजबरीने पळवून नेऊन अपहरण केले राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी,
नाशिक जिल्ह्यातील पंचवटी त इतर ठिकाणी नेऊन तरूणीचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो काढून तीला ब्लॅकमेल केले.तिच्यावर अत्याचार कले.
या आरोपावरून संशयित आरोपी ऋषीकेश विजय खंडागळे, केशव पनोहर सुद्रिक, संकेत संजय थोरात उर्फ बॉबी, विजय मेघराज खंडागळे, संजय मेघराज खंडागळे व शुभम (पुर्ण नाव ‘पाहीत नाही) या सर्वाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved