अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- अकोले तालुक्यातील विठा भागात राहणारी शेतकरी तरुणी राणी योगेश आवारी , वय ३० शेतात गेली असता ती घरी आली नाही तिचा शोध घेतला असता डॉक्टर भोकनळ यांच्या विहिरीजवळ चप्पल दिसून आली .
तेव्हा विहीरीत गळ टाकून राणी आवारी हिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. डॉक्टरकडे नेले मात्र ती उपचारापूर्वीच मयत झाली होती .
मयत राणी या तरुणीचे पती योगेश अशोक आवारी यांनी राजूर पोलिसात खबर दिल्यावरुन अमनं . ११ नोंदविण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
राणी योगेश आवारी ही तरुणी विहिरीत पडली ? का तिने आत्महत्या के ली ? तिच्या चपला विहिरीच्या काठावर कशा ? या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले .
दरम्यान राणी योगेश आवारी या तरुणीचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने तो काढण्यासाठी अनेकांनी मदत केली . तिच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com